Ad will apear here
Next
‘भारतदर्शन राष्ट्रीय महोत्सव २०१८’चे उद्घाटन


पुणे : ‘स्पर्धेच्या युगामध्ये नवनवीन तंत्रज्ञानाचा सर्रासपणे वापर केला जातो. तरुण पिढीला तंत्रज्ञानाची पूर्णतः माहिती असते, परंतु भवतालच्या घडामोडी, समाजातील प्रतिकूल परिस्थिती याबाबतही माहिती असणे अपेक्षित आहे. त्यामुळे तरुणांनाही प्रत्येक गोष्टीतील सत्यता माहिती करून घ्यावी,’ असे मत राष्ट्रीय विमुक्त जाती-जमाती आयोगाचे अध्यक्ष भिकूजी उर्फ दादा इदाते यांनी व्यक्त केले.

जयहिंद परिवार आणि लाइफस्टार ग्लोबल रिसर्च फाउंडेशनतर्फे ‘भारतदर्शन राष्ट्रीय महोत्सव २०१८’ या दोन दिवसीय महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. त्याच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. हे प्रदर्शन घोले रस्त्यावरील नेहरू सांस्कृतिक केंद्रातील राजा रवी वर्मा कलादालनात भरविण्यात आले आहे.

या प्रसंगी दिग्दर्शक निर्माते मुकेश कणेरी, अभिनेत्री देविका दफ्तरदार, चैताली चटर्जी, नृत्यांगना मधुमिता मिश्रा, सतीश खर्डे पाटील, संयोजक नारायण फड, नेहा जोशी, रिटा सेठिया, हसन शेख यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमात विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या मान्यवरांचा सन्मान करण्यात आला.



इदाते म्हणाले, ‘जगात विविध प्रकारची बुद्धिमत्ता असलेली माणसे आहेत. त्यात वाईट माणसे सक्रिय व चांगली माणसे निष्क्रिय आहेत. त्यामुळे चांगल्या माणसांनी पुढाकार घेऊन सकारात्मक गोष्टींचा प्रसार केला पाहिजे. समाजातील गरजूंना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचे काम नारायण फड यांच्यासारखे करीत आहेत, याचे समाधान आहे. अशा कार्यक्रमातून वंचित घटकांतील लोकांनाही आपल्या कलेला विकसित करण्याची संधी मिळेल.’

देविका दफ्तरदार म्हणाल्या, ‘कला माणसाला जगायला शिकवते. देशभरातून अनेक ठिकाणांहून कलाकार येथे आले आहेत. त्यांच्या कला व त्यांच्याविषयी जाणून घेता आले. कलेचे महत्त्व ओळखून आपण एखादी कला जोपासली पाहिजे.’

नारायण फड यांनी स्वागत-प्रास्ताविक केले. रिटा सेठिया यांनी सूत्रसंचालन केले. नेहा जोशी यांनी आभार मानले.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/LZJQBT
Similar Posts
पुणे येथे ‘ईबीजे वर्ल्ड फेस्ट’चे आयोजन लाइफस्टार ग्लोबल वेल्फेअर फाउंडेशन व जयहिंद परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने आणि भारतदर्शन वर्ल्ड सेंटर व आर्टिस्ट ग्लोबल कौन्सिल यांच्या सहकार्याने दोन दिवसीय ‘एज्युकेशन बिझनेस जॉब (ईबीजे) वर्ल्ड फेस्ट’चे आयोजन करण्यात आले आहे.
पुण्यात दोन दिवसीय भारतदर्शन राष्ट्रीय महोत्सव पुणे : जयहिंद परिवार, लाइफस्टार ग्लोबल वेलफेअर फाउंडेशन, भारतदर्शन वर्ल्ड सेंटर आणि आर्टिस्ट ग्लोबल कौन्सिल यांच्या संयुक्त विद्यमाने दोन दिवसीय कला व हस्तकला प्रदर्शन आणि भारतदर्शन राष्ट्रीय महोत्सवाचे आयोजन केले आहे. २७ व २८ ऑक्टोबर २०१८ रोजी घोले रस्त्यावरील नेहरू सांस्कृतिक सभागृहात हा महोत्सव होणार आहे
पुणे येथे ‘आर्टस् अँड हँडिक्राफ्ट्स’ प्रदर्शन पुणे : लाइफस्टार ग्लोबल वेलफेअर फाउंडेशन व जयहिंद परिवारातर्फे दोन व तीन जून २०१८ या कालावधीत इंडियन आर्टस् अँड हँडिक्राफ्ट्स प्रदर्शनाचे आयोजन केले आहे.
‘तरुणांनी आवडीच्या क्षेत्रात करिअर करावे’ पुणे : ‘एखादी गोष्टी सध्या करण्यासाठी आवड आणि जिद्द महत्त्वाची असते. आपल्याला आवडणाऱ्या क्षेत्रात जिद्दीने काम केले, तर यशाच्या वाटेने आपला प्रवास होतो. त्यामुळे नोकरी किंवा व्यवसाय करताना तरुणांनी आपल्याला आवडणाऱ्या क्षेत्रात करिअर करण्यावर भर द्यायला हवा,’ असे मत माणिकचंद समूहाच्या कार्यकारी संचालक जान्हवी धारीवाल यांनी व्यक्त केले

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language